कुडाळ /-

झाराप, ता.२१,कुडाळ तालुक्यातील झाराप गांव चा शिमगा उत्सव म्हणजे सांस्कृतिक वैभव असलेला हा राज्योत्सव अनुभवण्यासारखाच! झाराप चे हे संचित युवा पिढीने टिकवून ठेवले आहे. परंपरेने पुढे नेले आहे….! आज घोड़ेमोडणी हे उत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे. झाराप गावांमध्ये घोडेमोडणीची प्रथा आढळते. घोडेमोडणी म्हणजे घोडयाचा मुखवटा असलेला वेश परिधान करुन केलेला पारंपरिक नाच. गावातील तरुण हा वेश परिधान करून पारंपरिक गाणी म्हणत हा नाच करतात. घोडेमोडणी ही देवळात किंवा मांडावर सादर केली जाते. झाराप मधे होळी ला घोडेमोडणी आजही तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. परंपरागत एक घोडा असतो देवाचे नाव घेऊन
घोडेमोडणीची सुरवात होते, मग नाचत नाचत झाराप ची ग्रामदेवता भावई मंदिराला पाच प्रदक्षिणा घालतात. ह्यात सती जाणे हा पण एक प्रकार असतो. म्हणजे ह्या घोड्यावरून युद्ध करताना एक योद्धा मरतो मग त्याची बायको सती जाते असा पण एक प्रसंग असतो.अतिशय गुण्या गोविदाने पाच दिवसा चा शिमोगो उत्सवधुळवडी ने साजरा झाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page