Gold Rate Today: उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर

Gold Rate in Maharashtra Today (22nd April 2024): गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात होत असलेल्या दरवाढीला सोमवारी (22 एप्रिल 2024) ब्रेक लागला आहे. सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. जाणून घ्या या घसरणीनंतर सोने आणि चांदीचे आजचे दर काय आहेत.
Gold Rate Today उच्चांकावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात घसरण जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर
सोन्याचा आजचा भाव, 22 एप्रिल 2024 (Gold price today, 22nd April 2024): लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोने - चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. सोने आणि चांदीच्या दरात इतकी तेजी सुरू आहे की, सोने-चांदीचे दर दररोज नवनवीन उच्चांक गाठताना दिसून आलं. सोने महागलं असल्याने दागिने खरेदीसाठी नागरिकांना खिसा जास्तच खाली करावा लागत आहे. सोने आणि चांदीच्या दरात अचानक इतकी मोठी वाढ झाली त्यामुळे सोने स्वस्त कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडत आहे. पण आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण, सोमवारी (22 एप्रिल) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घेऊयात सोने आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली आहे आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सोने-चांदीचा दर किती आहे.

सोन्याच्या दरात घसरण

सोमवारी (22 एप्रिल) सोन्याच्या दरात घसरण झाली. Goodreturns वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांनी घसरण झाली. या घसरणीमुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 74,240 रुपयांवरुन 73,690 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांनी घसरण झाली. या घसरणीमुळे 22 कॅरेट सोन्याचा दर 68,050 रुपयांवरुन 67,550 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 410 रुपयांनी घसरण झाली. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा दर 55680 रुपयांवरुन 55270 रुपये प्रति तोळा इतका झाला.

24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (24 Carat gold rate today)

शहराचे नावआजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)कालचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई73,690 रुपये74,240 रुपये
पुणे73,690 रुपये74,240 रुपये
नागपूर73,690 रुपये74,240 रुपये
कोल्हापूर73,690 रुपये74,240 रुपये
जळगाव73,690 रुपये74,240 रुपये
सांगली73,690 रुपये74,240 रुपये
बारामती73,690 रुपये74,240 रुपये

22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (22 Carat gold rate today)

शहराचे नावआजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)सोन्याचा कालचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई67,550 रुपये68,050 रुपये
पुणे67,550 रुपये68,050 रुपये
नागपूर67,550 रुपये68,050 रुपये
कोल्हापूर67,550 रुपये68,050 रुपये
जळगाव67,550 रुपये68,050 रुपये
सांगली67,550 रुपये68,050 रुपये
बारामती67,550 रुपये68,050 रुपये

चांदीचा आजचा दर (Silver rate today)

शहराचे नावआजचा चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)कालचा चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)
मुंबई85,500 रुपये86,500 रुपये
पुणे85,500 रुपये86,500 रुपये
नागपूर85,500 रुपये86,500 रुपये
कोल्हापूर85,500 रुपये86,500 रुपये
जळगाव85,500 रुपये86,500 रुपये
सांगली85,500 रुपये86,500 रुपये
बारामती85,500 रुपये86,500 रुपये

चांदीच्या दरात किती रुपयांनी घसरण ?

सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरात सुद्धा घसरण पहायला मिळत आहे. Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी (22 एप्रिल 2024) चांदीच्या दरात 1000 रुपयांनी घसरण झाली. यामुळे चांदीचा दर 86500 रुपयांवरुन 85500 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.
ताज्या बातम्या
लेखाचा शेवट