Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vishal lonari

Others

2.9  

vishal lonari

Others

संध्याकाळ

संध्याकाळ

1 min
8.0K


दिवसाच्या अपूर्णतेस स्वरुप देते

सूर्यबिंबास निजवत संध्याकाळ येते

कधी ती बनते कातरवेळची

उरातल्या हुंकारास आसवे देते

कधी ती ओली असते पहिल्या प्रीतीने

सोवळी पिवळी फुले ओटीत घालते

शुभ्र चांदणे जागवती मोहरत्या भावना

संध्याकाळ केव्हा तर बिजलीसम कडाडते

लटपटत्या मनातील भावनांना

शब्दांचे कोंदण संध्याकाळ देते

सललेल्या क्षणांचे आठव हिरवे

तळव्या पानावर संध्या सजवते

मन गाभाऱ्याच्या अपूर्णतेस स्वरुप देत

शीतल छायेत हरेकास

निजवत संध्याकाळ जाते


Rate this content
Log in