Page Nav

HIDE

Left Sidebar

TO-LEFT

Pages

किराणा दुकानदार आणि ग्राहक यांचा संवाद

  किराणा दुकानदार आणि ग्राहक यांचा संवाद  ग्राहक - मला काही सामान पाहिजे..  दुकानदार - कोणतं सामान पाहिजे ? ग्राहक - बाजरी चे पीठ एक किलो, ...

 किराणा दुकानदार आणि ग्राहक यांचा संवाद 




ग्राहक - मला काही सामान पाहिजे.. 

दुकानदार - कोणतं सामान पाहिजे ?

ग्राहक - बाजरी चे पीठ एक किलो, ज्वारीचे पीठ एक किलो, आणि तांदूळ अर्धा किलो

दुकानदार - कोणता तांदूळ ?

ग्राहक - बासमती 

दुकानदार - अख्खा किंवा  तुकडा ?

ग्राहक - अख्खा ११० रुपये वाला 

दुकानदार -हो देतो, आणखी काही हवं ?

ग्राहक - हो थांबा सांगतो.. एक मसूरची दाळ द्या , आणखी अर्धा किलो राजमा

दुकानदार - सुकामेवा पाहिजे का?

ग्राहक - नाही 

दुकानदार - मसाले पण आहेत सर्व .. ही चहा पाऊडर घेऊन जा.. चांगली आहे

ग्राहक - चला एक लहान  पॅकेट द्या.. शेठ योग्य भाव लावा 

दुकानदार - तुम्हाला जास्त नाही लावणार, आपले होलसेल भाव असतात.. 

ग्राहक -बोला ..  किती पैसे झाले 

दुकानदार - ५५० रुपये झाले .. 

ग्राहक - शेठ काही तरी कमी करा .. जास्त होतात हे

दुकानदार - योग्य भाव आहेत, जास्त नाही भाव  पण तुम्हाला अर्धा किलो साखर देतो.. मोफत 

ग्राहक - ठीक आहे.. 

दुकानदार - या पुन्हा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत